Ad will apear here
Next
बॅ. नाथ पै यांच्यासारखे उमदे समाजवादी व्यक्तिमत्त्व दुर्मीळ
समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूकाका अवसरे यांचे उद्गार
बाबूराव अवसरे यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना अनुराधा आचरेकर.

मालवण :
‘बॅ. नाथ पै यांच्यासारखे उमदे समाजवादी व्यक्तिमत्त्व होणे आता दुर्मीळच आहे. बॅ. नाथ पै प्रथमच मालवण शहरात आले, त्या वेळी आम्ही त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या पहिल्याच भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती,’ अशी आठवण समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूकाका अवसरे यांनी आचरे येथे बॅ. नाथ पै नगरीत बॅ. नाथ पै स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा स्तर वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करताना सांगितली.

व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त आणि बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुशे, मालवणच्या नाथ पै सेवांगणचे सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर, मालवण नगर वाचनालयाचे प्रमुख ग्रंथपाल संजय शिंदे आणि स्पर्धा संयोजक रामकृष्ण रेवडेकर होते. 

आपल्या भाषणात बाबूकाका म्हणाले, ‘भारताच्या इतिहासामध्ये राजकारणात समाजवादी विचारसरणीचा उदय होताच जी झुंजार व्यक्तिमत्त्वे निर्माण झाली, त्यात नाथ पै हे नाव प्रमुख होते. समाजवाद पुढे जावा हे आंतरिक धोरण आणि महत्त्वाकांक्षा मनात धरून जे धडपडणारे तरुण पुढे आले त्यापैकी नाथ पै होते. त्यांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने केवळ कोकणच नव्हे, तर देशवासीयांचीही मने जिंकली.’ 

प्रकाश कुशे, जेरॉन फर्नांडिस, लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय शिंदे यांचीही या वेळी भाषणे झाली. याच कार्यक्रमात बाबूकाका अवसरे यांच्या हस्ते बॅ. नाथ पै प्रशंसोद्गार स्पर्धेचे पारितोषिक वितरणही झाले. साने गुरुजी कथामालेने ही स्पर्धा आयोजित केली होती. बाबूकाका अवसरे यांच्या हस्ते विजेत्यांना बॅ. नाथ पै प्रशंसोद्गार स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि प्रशंसोद्गार प्रमाणपत्र देण्यात आले. मध्यंतरी मालवण येथील बॅ. नाथ पै. सेवांगण येथे ‘मातीच्या भांड्यांवरील रंगकाम’ हे कृतिसत्र महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते. बॅ. नाथ पै आज असते, तर ग्रामीण भागातील महिलांनी रंगविलेले हे माठ पाहून ते काय म्हणाले असते, याची कल्पना करून प्रशंसोद्गार लिहिण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तीच ही बॅ. नाथ पै प्रशंसोद्गार स्पर्धा. 

स्पर्धेचा निकाल  (अनुक्रमे पहिले तीन क्रमांक)
- अनुराधा आचरेकर (आचरे)
- उज्ज्वला आनंद महाजन (मुणगे-कारिवणेवाडी)
- सुगंधा केदार गुरव (आचरे)
 
विजेत्यांपैकी उज्ज्वला महाजन यांनी आपले विचार प्रकट केले. प्रास्ताविक माधवराव गावकर यांनी केले, तर आभार परशुराम गुरव यांनी मानले. सूत्रसंचालन अनुराधा आचरेकर यांनी केले. 

या कार्यक्रमाला सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर, बबनराव वझे, अनिल करंजे, रवींद्र वराडकर, तात्या भिसळे, कुमार कदम आदी साने गुरुजी कथामाला आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

(बॅ. नाथ पै स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा स्तर वक्तृत्व स्पर्धेचा निकाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZPLBW
Similar Posts
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रणिता कोटकर प्रथम मालवण : बॅ. नाथ पै स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा स्तर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कुडाळच्या व्हिक्टर डॉन्टस विधी महाविद्यालयाची प्रणिता प्रदीप कोटकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. साने गुरुजी कथामाला (मालवण) आणि कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा यांनी नुकतीच ही स्पर्धा आयोजित केली होती. आचरे येथील बॅ
मराठी सक्तीची मागणी करणाऱ्या आंदोलनाला ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचा पाठिंबा मालवण : ‘महाराष्ट्रात सर्व क्षेत्रांत मराठी सक्तीची झालीच पाहिजे,’ या आंदोलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने एकमुखी पाठिंबा व्यक्त केला आहे. २४ जून २०१९ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे २४ मराठी संस्थांच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि पद्मश्री मधू मंगेश कर्णिक
‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे बरसला ‘पाऊस शब्दसुरांचा!’ आचरा (मालवण) : सध्या कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘पाऊस शब्दसुरांचा’ या छोट्या साहित्य संमेलनाचे नुकतेच आचरे गावात आयोजन करण्यात आले होते.
माहेर प्रकटन स्पर्धेत सुनंदा कांबळे प्रथम मालवण : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माहेर : एक प्रकटन’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजयदुर्ग येथील सुनंदा कांबळे यांनी त्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रथम तीन क्रमांकांसह तीन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले असून, या सर्वांना २५

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language